धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात महिलेचा गेला तोल, अन्… पुढे काय झाले पहा या Video मध्ये
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । अति घाई संकटात नेई, असं आपण अनेकवेळा वाचले किंवा ऐकलं पण असेल. काही जण जीव धोक्यात टाकून चालू रेल्वे पकडण्याचे धाडस करत असतात. यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच एक व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे एका महिलेचा जीव वाचल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
सोलापूर रेल्वे स्थानकावर फलाटावर उभ्या असलेल्या एका महिलेने दुसऱ्या हातात बॅग घेऊन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तिचा तोल गेला आणि ती घसरली. ती तिच्या पाठीवर पडली आणि सुरक्षा कर्मचार्यांनी तिच्याकडे धाव घेऊन त्या महिलेचा जीव वाचवला. रेल्वे सुरक्षा रक्षकाच्या हुशारीने महिलेला गंभीर दुखापतीपासून वाचवले. या संपूर्ण घटनेने महिलेला धक्का बसला आणि तिला नीट चालताही येत नव्हते. मात्र सुरक्षा रक्षकांमुळे ती गंभीर जखमी होण्यापासून वाचली.
येथे व्हिडिओ पहा: