Exclusive : निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी ठाकरे गटाचा शिंदे गट व भाजपातील नाराजांकडे डोळा!
जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत स्वतःचा नवीन गट स्थापन केला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे शिवसेनेला खिंडार पडला आहे इतकं मोठं खिंडार ठाणे जिल्हा नंतर शिवसेनेला कुठेही पडलेलं नाही. शिवसेनेचे (Shivsena) सर्वच मातब्बर नेते हे शिंदे गटामध्ये आले आहेत. दुसरीकडे ठाकरे गटकडे नेते जरी नसले तरी मोठ्या प्रमाणावर निष्ठावान कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते व नेते शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी उभे ठाकले आहेत. मात्र ऐन जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या व इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेला उमेदवार मिळतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Jalgaon ZP News)
शिवसेनेकडे प्रत्येक ठिकाणी स्वतःचा उमेदवार असल्याचा दावा करण्यात येत असला तरी निवडून येतील असे उमेदवार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे नसल्यामुळे ठाकरे गट शिवसेनेचा डोळा हा शिंदे गट व भाजपातील नाराजांकडे असणार आहे, हे उघड सत्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एका जागेसाठी शिंदे गटाकडे व भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे दोन दोन उमेदवार आहेत. हे दोन्हीही पक्ष युती करून येत्या काळात निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. अशावेळी ज्या इचुकांना उमेदवारी मिळणार नाही त्या नाराज इच्छुकांकडे शिवसेनेचे लक्ष आहे व त्यांना फोडून त्यांना शिवसेनेत घेतले जाणार असून त्यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी दिली जाणार आहे. असे म्हटले जात आहे. (Zp shivsena Plan)
आपल्यातील कोणतेही इच्छुक नाराज होऊ नयेत व प्रत्येकाला सन्मान देऊन स्वतःकडे वळवले पाहिजे असे मत शिंदे गटाचे आहे. अशावेळी शिंदे गट नक्की काय पवित्र घेतो आणि कशाप्रकारे स्वतःकडचे नाराज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाकडे जाणार नाहीत याची काळजी घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आणि येत्या काळात जळगाव जिल्ह्यातील जनता नक्की कोणत्या शिवसेनेच्या गटाला बहुमत देते हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Jalgaon Zp Election)