⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | अब की बार, स्मिताताई खासदार..!

अब की बार, स्मिताताई खासदार..!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई उदय वाघ यांच्या प्रचारार्थ महायुतीकडून जळगाव मधील फुले मार्केट येथे जोरदार प्रचार रॅली झाला. या प्रचार रॅलीत सहभाग नोंदवून प्रत्येक व्यापारी वर्गाला कमळ या निशाणीचे बटन दाबून, स्मिताताई वाघ यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकी ताई पाटील यांनी यावेळी केले.

या प्रचार रॅलीला व्यापारी वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त घोषणा देत, फुले मार्केट दणाणून काढले. या प्रचार रॅलीमध्ये महायुती कडून आमदार राजूमामा भोळे, शिवसेनेच्या नेत्या सरला कोल्हे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, विनोद देशमुख, अनिल अडकमोल, प्रकाश बालानी, आरपीआय आठवले गटाचे खरात यांच्यासह महायुतीचे बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.