आदित्य ठाकरे यांनी साधला राज ठाकरेंवर निशाणा
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । एकनाथ शिंदे शिवसेनेतून पंढरी केल्यानंतर शिवसेनेला खऱ्या अर्थाने मोठा धक्का बसला आहे . या धक्क्यातून सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे.
नुकतेच ते एका गणेश मंडळाच्या दर्शनासाठी गेले होते. नवी मुंबई येथील हे गणेश मंडळ होतं. या ठिकाणी त्यांनी शिवसैनिकांची व युवकांशी संवाद साधला. संवाद साधला याचबरोबर तेथे उपस्थित पत्रकारांची देखील बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात होणाऱ्या संभाव्य युतीबद्दल एकनाथ आदित्य ठाकरे यांना काय वाटतं असं विचारलं असता अर्ज ठाकरे यांनी उत्तर दिले की, शिवसेना संपवण्याचा घाट कोण घालत आहे आणि त्यामागे कोणकोणते हात आहेत हे आता समोर यायला लागले आहे. त्या दोघांमध्ये युती होईल की नाही माहित नाही मात्र शिवसेना संपवण्याचा प्रयत्न कोण कोण करत आहे हे जनतेसमोर हळूहळू यायला लागला आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.