भुसावळ

धक्कादायक : भावानेच केली बहिणीची फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्कद्वारे नाव कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात बहिणींच्या नावाने खोट्या सह्या व खोटे दस्तावेन देऊन चक्क भावानेच बहिणीची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीसांत एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपाली दर्शन सोनार (30, रा.म्हाळसाई गणेश कॉलनी, पाचोरा) यांचे माहेर भुसावळ येथील शांतीनगरातील आहे. वडील अशोक बाबुराव चव्हाण यांच्या मौजे सतारा, मौजे निंभोरा, मौजे खडका, मौजे यावल या ठिकाणी प्लॉट आहे तसेच आईच्या नावावरही प्लॉट आहे. त्याचा व्यवहार किंवा विकासकामे करण्यासाठी वेळोवेळी भुसावळला येणे शक्य नसल्याने भाऊ मयूर अशोक चव्हाण याने बहिणींकडून जनरल मुक्त्यारपत्र करून देण्याचा तगादा लावल्यानंतर बहिणींनी वडील हयात असताना जनरल मुक्त्यारपत्र तयार करून दिले.

वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ मयूर चव्हाण याने सामूहिक वारसा हक्काच्या मिळकतीचे हक्क सोड पत्रावर सह्या घेतल्याचे लक्षात आले व तसेच या मुक्तार पत्राचा गैरवापर होऊ नये म्हणून दिवाणी न्यायालयात बहिणींनी खटला देखील दाखल केला मात्र भाऊ मयूर चव्हाण यांनी वारसा हक्कातील नावे कमी करण्यासाठी कंडारी शिवारातील तलाठी यांना अर्ज दिला. वारस हक्काची नावे कमी करण्यासाठी दिली जाणारी नोटीस मिळू नये यासाठी नोटीसीवर खोट्या व बनावट सह्या असलेले दस्तावेज तलाठी यांना जमा केल्याने रुपाली दर्शन सोनार यांनी भाऊ मयूर चव्हाण याच्याविरुद्ध विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंबादास पाथरवट पुढील तपास करीत आहे.

Related Articles

Back to top button