अरे बापरे : जळगाव शहरात तब्बल २२ हजार भटके कुत्रे
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांमुळे हैराण झाले आहेत. शहरातील प्रत्येक चौकात व गल्लीत कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कुत्र्यांची संख्या ही संपूर्ण शहरांमध्ये वाढत आहे. शहरातील फुले मार्केट, मटन मार्केट, महानगरपालिका, बाजारपेठ, जुना जळगाव व इतर परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
भटक्या कुत्र्यांचा त्रास एवढा वाढला आहे की, गाडी चालवत असताना देखील कुत्र्यांपासून सावध राहावं लागत आहे. मुलांना शाळेत सोडताना आणताना कुत्र्यांचा त्रास होत आहे. अशी तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.
तर दुसरीकडे जळगाव शहरात महानगरपालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांना पकडले जातात त्यांचे निर्भीजी करणे केले जाते. मात्र ती कारवाई देखील आता थंडवली आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोश निर्माण झाला आहे. अशावेळी ही कारवाई पुन्हा सुस्थितीत यावी अशी नागरिकांची इच्छा आहे.
जळगाव शहरात तब्बल 22 हजार कुत्रे असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. यातील साडेचार हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले आहे. अशावेळी जळगाव शहरात इतरही समस्या असताना कुत्र्यांच्या समस्यांनाही नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक रोश व्यक्त करत आहेत.