⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख : ‘सी’ ग्रेड फिल्म करणारी मुलगी आता कमळाबाईची सुपारी वाजवते… नवनीत राणांवर टीका

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख : ‘सी’ ग्रेड फिल्म करणारी मुलगी आता कमळाबाईची सुपारी वाजवते… नवनीत राणांवर टीका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । नवनीत राणा (Navneet Rana) जरा तोंड सांभाळून… कोण आहात आपण? सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री… एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचूप्रवेश झाला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे. जळगावातील महाराणा प्रताप मित्र मंडळात हनुमान चालीसा पठणासाठी आल्या असताना खा.नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. ‘तू ठाकरे है तो मै भी राणा हू’ असे त्या म्हणाल्या होत्या. खा.राणा यांना संजना घाडी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी म्हणाल्या, आपला हनुमान चालीसाशी काय संबंध? हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचे साधे उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आले नाही आणि म्हणे मी हनुमान भक्त, असे घाडी म्हणाल्या. भाजपाच्या सी, डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितले. तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघाला. ज्या बाईला लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेले मातोश्री, मंदिर आणि मशिदीतील फरक कळत नाही, त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती, असा हल्लाबोल घाडी यांनी केला आहे.

मुंबईची आठवण करून देत घाडी यांनी, तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत, बाळासाहेबांचे राहिले नाहीत. असे नसते. याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लीम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची परवानगी दिली होती. त्यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केली होती. तुमच्यासारख्या मुंबईची मुलगी म्हणून घेणाऱ्या बाईला हे माहीत पाहिजे होते. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी सी ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवत आहे, हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले असल्याची खरमरीत टीका घाडी यांनी केली आहे.

घाडी पुढे म्हणाल्या की, कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई. त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही, अशा फाजील वल्गना करून असली थेरं महाराष्ट्राला दाखवू नका. शिवसेना ही कालही मजबूत होती, आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई, महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांचे नाक कापून पुढे येणार, असे संजना घाडी म्हणाल्या.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.