वाणिज्य

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा घसरल्या, त्वरीत तपासून घ्या आजचे पेट्रोल- डिझेलचे नवे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. पण देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर मागील काही दिवसापासून जुन्याच पातळीवर आहेत. महाराष्ट्र आणि मेघालय वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये तेलाच्या किमतीत तीन महिन्यांपूर्वी बदल झाला होता. त्यावेळी केंद्राने तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून मोठा दिलासा दिला होता. Petrol Diesel Rate Today

जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत.

तुमच्या शहरातील आजची किंमत (पेट्रोल-डिझेल ६ सप्टेंबर रोजी)

हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर
तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button