⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

सर्वसामान्यांना महागाईचा झटका; खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले, पहा काय आहे दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२४ । महागाईने होरपळणाऱ्या जनतेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. देशभरात खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले आहेत. गेल्यावर्षी केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातशुल्कात कपात करून ही कपात मार्च-२०२५ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही देशात खाद्यतेलाचे दर कमी होण्याऐवजी भडकले आहेत. मागील गेल्या काही दिवसात खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याने स्वयंपाकघरातील फोडणी महागली आहे.

आंतरराष्ट्रीय जगतात पाम तेलाच्या दरात वाढ होण्यासह त्याचा बायोडिझेलमधील वापर वाढल्याने आठवड्याभरात सोयाबीनसह सूर्यफूल तेलाच्या दरात घाऊक बाजारात प्रतिलिटरमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली. गेल्यावर्षी मार्च महिन्यात सोयाबीन तेलाचे घाऊक बाजारातील दर १३० रुपये किलोवर पोहोचले होते. सहा महिन्यांनी ते घसरले होते.

दरम्यान, भारत हा जगातील खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदर आहे. ६०% गरजा आयातीद्वारे पूर्ण करते. भारतात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पामतेल खरेदी केले जाते. तर अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयात करतो. सूर्यफूल बियाणे तेल आणि आरबीडी पाम मार्च 2025 पर्यंत कमी दराने आयात केले जाऊ शकतात. सोयाबीन तेल, खाद्य ग्रेड आणि क्रूड पाम तेल केवळ 31 मार्च 2024 पर्यंत सूट मिळू शकते अशी माहिती मिळाली होती. निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारकडून गृहिणींना दिलासा मिळेल का हे पाहावे लागेल.

खाद्यतेल सध्या १५ दिवसांआधी
सोयाबीन ११५- १०५
पाम ११५ -१००
राईस ११२- १००
सूर्यफूल ११५ -१०५
शेंगदाणा १७६-१७२
मोहरी १३० -१२०
जवस १२० -१२०
वनस्पती १३० -११५