म्हणून अमित शाह दरवर्षी घेतात लालबागच्या राजाच दर्शन
जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२२ | केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहे. मुंबई दौऱ्यावर असताना अमित शहा सर्वप्रथम लालबागचा राजाच्या दर्शनाला आले. त्यानंतर त्यांनी आपले सर्व कार्यक्रम केले. मात्र अमित शहा लालबागचा राजाला काही पहिल्यांदा आलेले नाहीत ते दरवर्षी लालबागचा राजाच दर्शन घेतातच.
असं म्हणतात की अमित शहा आपल्या खासगी बैठकांमध्ये लालबागच्या राजाची महती नेहमीच आपल्या जवळच्या लोकांना सांगत असतात. गुजरात मध्ये असलेल्या एक हनुमानाचे मंदिर आणि आणि मुंबईचा लालबागचा राजा या दोन्हीही देवस्थानाचे दर्शन अमित शहा नेहमीच घेत असतात.
अमित शाह जेव्हा संकट काळात होते आणि त्यांना गुजरात मध्ये जाण्याची परवानगी नव्हती यावेळी अमित शहा हे कित्येक दिवस मुंबईमध्ये होते. त्या काळात अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते व त्यांचा नवस पूर्ण झाला होता असं म्हटलं जातं, म्हणूनच की काय दरवर्षी न चुकता अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात.
याचबरोबर लालबागच्या राजाचे दर्शनाला कित्येक बडे नेते येतात दर्शन घेतात आणि निघून जातात. मात्र अमित शहा यांचा वेगळेपण असे की अमित शहा संपूर्ण लीन होत राजाचे दर्शन घेतात मनोभावे पूजा करतात आणि मगच निघतात यामुळे त्यांचा अनेक लालबागचा राजा दर्शन किती घट्ट आहे