जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२२ । मजुरीचे पैसे मागण्याच्या कारणावरून चक्क मिरवणुकीत गणपतीची आरती करताना पाठीत सूरा खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ भामा राठोड (वय ३५, रा. राजदेहरे गावठाण, चाळीसगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून राठोड हे ऊसतोड मजूर आहेत. दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राठोड यांनी संशयित आरोपी सुभाष लालू राठोड रा. राजदेहरे गावठाण, चाळीसगाव यांच्याकडे उसतोडीचे राहिलेले पैसे मागितले. दरम्यान, संशयित आरोपी सुभाष लालू राठोड याने गावात गणपती स्थापनाची मिरवणूक चालू असताना मिरवणूक ही फिर्यादी एकनाथ भामा राठोड यांच्या घरासमोर आली. त्यामुळे फिर्यादी एकनाथ भामा राठोड व त्यांची पत्नी मिरवणुकीतील गणपतीची पूजा करत असताना संशयित आरोपी सुभाष लालू राठोड याने त्याच्या हातातील सूरी एकनाथ भामा राठोड यांच्या पाठीवर खुपसून दुखापत केल्याने रक्त श्राव झाले.
या प्रकरणी एकनाथ भामा राठोड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी सुभाष लालू राठोड यांच्याविरुद्व गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांतीलाल पगारे करत आहेत.