Rain News : जिल्ह्यात ‘या’ दिवशी पाऊस लावणार हजेरी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । येत्यासोमवार पासून म्हणजेच उद्या पासून तब्बल १० तारखे पर्यंत जिल्ह्यात पाऊस असणार आहे.यामुळे संपूर्ण राज्यासह खान्देशात जोरदार पाऊस बरसणार आहे. 10 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पाऊस होणार असे म्हटले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 10 सप्टेंबर पर्यंत जिह्या सह संपूर्ण राज्यामध्ये परतीचा पाऊस होणार आहे. अशावेळी नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. याचबरोबर काही प्रमाणात का होईना पण शेतकरी राजा सुखावणार आहे.
गेल्या आठवड्याभरापासून गायब झालेला पाऊस आता पुन्हा बरसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस बरसणार आहे. जळगाव जिल्ह्यातही पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नागरिक सुखवतील यात शंका नाही.यंदा उशिरा आलेला पाऊस लवकर परतीच्या मार्गाला निघाला आहे. यामुळे शेतकरी राजा दुखावला आहे मात्र येत्या आठवड्याभरात संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात परतीचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील बहुतांश ठिकाणी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. यंदा राज्यात सरासरी 35 टक्के पर्यंत पाऊस झाला असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे येत्या काळातही तितकाच पाऊस होईल असा अंदाज आहे. राज्यात व जिल्ह्यात शेतकऱ्यांसह नागरिकही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे बाप्पाच्या आगमनालाच संपूर्ण राज्यात पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ७३.३७ टक्के तर तीन माेठ्या प्रकल्पांमध्ये ७०.९९ टक्के जलसाठा आहे. गिरणा प्रकल्प, अभाेरा, मंगरूळ, सुकी, ताेंडापूर आणि बाेरी हे प्रकल्प फुल्ल झाले आहेत. हिवरा, अग्नावती आभाेकरबारी या तीन प्रकल्पांमध्ये मात्र अजूनही जलसाठा २० टक्क्यांपुढे गेलेला नाही. वाघूर धरणही अजून पुरेसे भरलेले नाही. गेल्या वर्षी वाघूर नदीला जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान चार ते पाच पूर आले हाेते. यंंदा मात्र, या नदीचे पात्र अजूनही खळाळले नाही. त्यामुळे नदी काठावर असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे चित्र प्रकर्षाने समाेर येते आहे.