जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासाठी तीन हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका कर्मचारीला धुळे एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्यातच अटक केली. दरम्यान, या घटनेने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. आज दुपारी धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.
दीपक देविदास ठाकूर यास ताब्यात घेतले आहे. विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासह दोषारोपपत्र लवकर न्यायालयात सादर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागून चार हजारात तडजोड करून लाच स्वीकारणार्या चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे (52, रा.वैष्णवी पार्क, चाळीसगाव) व पोलिस नाईक शैलेश आत्माराम पाटील (38, रा. चाळीसगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवार, 28 जुन 2022 रोजीसायंकाळी सात वाजता सिग्नल चौकात रंंगेहाथ पकडले होते.
ही घटना ताजी असतानाच पुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचा कर्मचारी दीपक देविदास ठाकूर हा एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने पोलिस दलाचे नाव पुन्हा बदनाम झाले आहे. दरम्यान, या घटनेने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. आज दुपारी धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.