बातम्या

शेतकऱ्यांनो काळजी घ्या : केळीनंतर आता साेयाबीन, कापसावर राेगाचा प्रादुर्भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । ढगाळ वातावरण असल कि खरिपातील पिकांवर राेगराई वाढीसाठी पाेषक असल्याने सध्या पिकांवर राेगराईचा प्रादुर्भाव होतोच. जिल्ह्यात सध्या तीच स्थिती आहे. केळीपाठाेपाठ आता साेयाबीन, कापूस ही पिके राेगराईला बळी पडत असल्याने शेतकरी वर्गाची झाेप उडाली आहे.

जिल्ह्यात तब्बल साडेपाच लाख हेक्टरवर कापूस, ४५ हजार हेक्टरवर केळी आणि २९ हजार हेक्टरवर साेयाबीनचा पेरा आहे. हे तीनही पिके या महिन्यात राेगराईला बळी पडली आहेत.यामुळे जिल्ह्यात बळीराजा चिंतेत आहे. केळीवर सीएमव्ही या राेगाचा तर कापसावर तुडतुडे आणि काही ठिकाणी बाेंडअळीचा शिरकाव झाला आहे.जी एक वाईट बाब आहे. साेयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याची स्थिती आहे. ऐन फुलाेरात साेयाबीनवर राेगराईचा प्रभाव जाणवत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम हाेण्याची शक्यता आहे.

अशी घ्यावी काळजी
{ कापूस : तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला अाहे. हेक्टरी पाच फेराेमाेन सापळे लावावेत, लाल्या राेगाच्या नियंत्रणासाठी खताची मात्रा नियमित शिफारसीपेक्षा २५ टक्के अधिक द्यावी. हेक्टरी ३० किलाे मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे. २ टक्के डीएपी फवारणी करावी.
{ साेयाबीन : ढगाळ वातावरणाने खाेडमासीचा प्रादुर्भाव आ हे. त्यासाठी क्लाेरानट्रानिलीप्राेल फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी पाच फेराेमाेनन सापळे लावावेत. पिवळसर पानांवर १३:००:४५ खताची फवारणी करावी.
{ केळी : केळी बाग भुसभुसीत राहावी म्हणून काेळपणी करावी. राेगग्रस्त पाने कापून नष्ट करावीत. बाग नेहमी स्वच्छ ठेवावी. बाग माेठी असेल तर पावसामुळे मुळे सैल हाेऊ शकतात. त्यामुळे झाडांना आंधार द्यावा.

Related Articles

Back to top button