विद्यापीठाच्या भरमसाठ शुल्कवाढीच्या विरोधात अभाविपचे आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यापीठाने वाढविलेल्या भरमसाठ शुल्कावाडीच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. व संपूर्ण विद्यापीठ भारत माता की जय, वंदे मातरम, कुलगुरू हमे पडणे, दो देश को आगे बडणे दो अश्या घोषणानी गजबजले होते. त्यावेळी मोठया संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रांत मंत्री अंकिता पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, उत्तर महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या लाखो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्रोत म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची ओळख आहे. तरी अशी अचानक इतक्या प्रमाणात शुल्क वाढ करणे चुकीचे असून हा निर्णय विद्यापीठाने तात्काळ मागे घ्यावा. विद्यापीठामार्फत सुमारे 40% ते 73% पर्यंत शुल्क वाढ करण्यात आलेली आहे. या शुल्क वाढीचा फटका विभागातील गरीब विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या मुलांना बसणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही अन्यायकारक शुल्कवाढ तातडीने कमी करावी व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागमी अभाविप ने कुलगुरू महोदयांन कडे केली.
प्रसंगी विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, प्रांत शोध कार्य संयोजक अश्विन सुरवाडे , जिल्हा संयोजक मयूर माळी, महानगर मंत्री रितेश महाजन, चैतन्य बोरसे, नितेश चौधरी, भूमिका कानडे, पवन बावस्कर, हांसराज चौधरी, चेतन नेमाडे, प्रीतम निकम, वैभवि ढिवरे, मोनाली जैन, मनीष चव्हाण, योगेश अहिरे, आदित्य चौधरी व संपूर्ण विभागातून कार्यकर्ते उपस्थित होते.