जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. दरम्यान, शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्याने यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेणार की एकनाथ शिंदे याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेतेपदी बढती दिलेल्या भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला इशारा दिला होता. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असून राजकीय अधिकारात कोणी हात टाकल्यास त्याचा राजकीय प्रवास भस्मसात होईल, असं जाधव म्हणाले होते,
आता जाधव यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटातील राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जोरदार प्रत्त्येतर दिले आहे. शिवसेना कोणाची आहे, यापेक्षा शिवसेना वाचवली कोणी, हे सर्वात महत्त्वाचे आहे. शिवसेना वाचवण्यासाठी सर्वात मोठे काम कोणी केले असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, असं गुलाबराव पाटील म्हणाले. लोक जेव्हा जळगाव शहरातल्या खड्डयांबद्दल बोलून दाखवतात, तेव्हा आम्हाला आमची लाज वाटते अशी खंत यावेळी गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना नरेंद्र मोदींवर टीका करणारे गुलाबराव पाटील शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आता भाषणात मोदी मोदी करत देखील पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ल्या काळात मंत्री असताना पक्ष पाहिला नाही. मोदींनी सांगितलं गुलाब महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज, त्यानुसारच मोदी सरकारची ‘हर घर जल और हर घर नल’ ही योजना राबवून मोदींची स्वप्नपूर्ती साकारत असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं.