जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । शिक्षण हे प्रगत समाजाचे प्रमुख लक्षण असून उज्ज्वल भविष्याचे एक आवश्यक साधन आहे. शिक्षणाद्वारे जे काही चांगले ते साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षण हे सामाजिक आणि वैयक्तिकरित्या सर्वांसाठी महत्वाचे आहे. शिक्षणामुळे चांगुलपणाची भावना विकसित होते. शिक्षण कोणत्याही मोठ्या कौटुंबिक, सामाजिक आणि अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्याची क्षमता प्रदान करते. कोणीही शिक्षणाचे महत्त्व दुर्लक्षित करू शकत नाही. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन वर्ल्ड व्हिजन इंडिया ने धरणगाव तालुक्यातील २३ गावांमध्ये रेमेडीयल एज्युकेशन सेंटर सुरू केले आहेत. या सेंटर्स मधे ज्या मुलांना लिहिता – वाचता येत नाही आणि पायाभूत गणित येत नसलेल्या विद्यार्थ्यांकरिता वर्ल्ड व्हिजन ने हे शिकवणी वर्ग सुरू केलेले आहेत. शिक्षकांना शिकवणीसाठी साहित्य पुरविण्यात आलेले आहे. गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी तहाकळी गावात वर्ल्ड व्हिजन इंडिया द्वारा या ४२ रेमेडियल एज्युकेशन सेंटर्स ला दोन लक्ष रुपयाचे पुस्तके वितरण करण्यात आले.
त्याच प्रमाणे २३ गावातील मुलांना वितरण करण्यासाठी असलेले सर्व शासकीय योजनांचे ( केंद्र शासन आणि राज्य शासन योजना) माहिती पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. जी. प. सदस्य प्रताप भाऊ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात त्यांनी वर्ल्ड व्हिजन च्या कार्याची प्रशंसा करीत संस्था करीत असलेल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी देखील वर्ल्ड व्हिजन करीत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. तसेच वर्ल्ड व्हिजन चे अधिकारी अमित राठोड यांनी समाजाचे आभार मानले आणि लकेलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रतापभाऊ पाटील जिल्हा परिषद सदस्य, नायब तसीलदार लक्ष्मण सातपुते साहेब, तहाकळी ग्रामसेवक संजय जाधव साहेब, तहाकळी सरपंच दीपक चव्हाण, पोखरी सरपंच गोकुळ शिंदे, भोणे सरपंच रातीलाल पाटील, फुलपात सरपंच हरिभाऊ पाटील, उपसरपंच दत्तू पाटील, वराड बू पोलीस पाटील राजुभाऊ वाडले, एकात्मिक बाल विकास अधिकारी संजय धनगर आणि सुपरवाइजर राजश्री पाटील मॅडम व उज्वला पाटील मॅडम, तहाकळी ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील,नितीन चौधरी, सुरेश कोळी, छत्रभुज पाटील, मछींद्र साळुंके, अभा माळी, REC स्पॉन्सर योगेश चौधरी आणि अशोक पवार. वर्ल्ड व्हिजन इंडिया चे सिनियर मॅनेजर अमित राठोड साहेब, वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प अधिकारी अनिल तेजप्पा बल्लूरकर, प्रोग्राम कोऑरडीनेटर अंकिता मेश्राम ,विजय राऊत, स्वयंसेवक प्रकाश पाटील,आरती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.