⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | महत्वाची बातमी : एलआयसी हाउसिंग, बजाज हाउसिंगच्या कर्जदरात वाढ

महत्वाची बातमी : एलआयसी हाउसिंग, बजाज हाउसिंगच्या कर्जदरात वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ ।  मॉर्गेज कर्जपुरवठा करणाऱ्या बजाज हाउसिंग फायनान्स आणि एलआयसी हाउसिंग फायनान्सने सोमवारी कर्जावरील व्याजदरात ०.५० टक्का वाढ केल्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेने वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मे महिन्यापासून आतापर्यंत रेपोरेटमध्ये १.४० टक्के वाढ केल्यानंतर सर्वच बँका, वित्तीय कंपन्यांनी कर्जदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, कर्जदरात वाढ करूनही स्पर्धात्मक दरात आणि वेगवेगळ्या ऑफर्स देत असल्याचे या कंपन्यांचा दावा आहे.

मुख्य व्याजदरात ०.५० टक्का वाढ केल्याने गृहकर्जाचा नवा व्याजदर पूर्वीच्या ७.५० टक्क्यांवरुन ८ टक्क्यांपासून सुरु झाला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक वाय. विश्वनाथ गौड म्हणाले की, व्याजदर वाढविण्यात आला असला तरी गृहकर्जाची मागणी वाढलेली राहील. आरबीएल बँकेने एमसीएलआर दरात १० ते १५ टक्का वाढ केली आहे. त्यामुळे कर्जाचा दर ८.०५ टक्के ते ९.२५ टक्क्यांच्या दरम्यान राहील. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने व्याजदरात वाढ करावी लागत असल्याचे बँकेने एलआयसी हाउसिंग फायनान्सने वेबसाईटवर नमूद केले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह