जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात दुचारी चोरीचे प्रमाण वाढल्याने आता पोलिस प्रशासन देखील सतर्क झाले आहे. सावदा पोलिसांनी दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधत त्याच्याकडून गाते येथून लांबवलेली दुचाकी जप्त केली आहे.
मनोज दिनकर बार्हे (23, उदळी बु.॥, ता.रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या संशयीतासोबत अन्य विधी संघर्षित बालकासही ताब्यात घेण्यात आले आहे. गाते येथील नितीन विलास तायडे (19) यांची दुचाकी (एम.एच.19 डी.एक्स.2462) ही गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी रात्री आपल्या घरासमोर उभी केली असता 17 ऑगस्टच्या रात्री 10 ते 18 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी ती लांबवली होती. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक निरीक्षक डी.डी. इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, एएसआय सपकाळे, पोलीस नाईक अक्षय हिरोळे, पोलीस कॉन्स्टेबल कुरकुरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीवरून मनोज दिनकर बार्हे (23) व विधी संघर्षित बालक (दोघे रा.उदळी बु.॥, ता.रावेर) यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दुचाकी काढून दिली. अधिक तपास नाईक सखाराम हिरवाळे हे करीत आहेत.