जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात रोज १ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असले तरी यात विशेष वाढ होत नाहीये. आज जिल्ह्यात १०४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर १००६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
यात जळगाव शहरासह चोपडा, एरंडोल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यात संसर्ग कायम आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी नागरीकांनी काळजी घेणे हाच एक पर्याय आहे. जिल्ह्यात आजच्या बाधित रूग्णांमुळे एकुण १ लाख १५ हजार ७९८ बाधित रूग्णांची संख्या झाली असून त्यापैकी १ लाख २ हजार ७९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १० हजार ९४६ बाधित रूग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २०५८ वर गेला आहे.
जळगाव शहरासाठी दिलासा
दरम्यान, जळगाव शहरात मागील काही दिवसापासून रुग्ण संख्येचा आकडा घटताना दिसून येत आहे. काही दिवसापासून शहरात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज शहरात १६५ नवे रुग्ण आढळून आले आहे तर आजच २३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिलासादायक असे की, शहरात आज एका रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. शहरातील एकूण मृताचा आकडा ४८१ वर गेला आहे.
जळगाव शहर- १६५, जळगाव ग्रामीण- ३२, भुसावळ-९७, अमळनेर-४१, चोपडा- ११०, पाचोरा- ६०, भडगाव-२७, धरणगाव- ३०, यावल- ३६, एरंडोल- १०१, जामनेर- ६३, रावेर- १०२, पारोळा- ३७, चाळीसगाव- ४३, मुक्ताईनगर- ४३, बोदवड- २२ आणि इतर जिल्हे ०७ असे एकुण १०४६ बाधित रूग्ण आढळले आहे.