बातम्या

गुलाबराव पाटलांना झापलं हे योग्यच केलं, उद्धव ठाकरेंनी केल नीलम गोऱ्हेंचं कौतुक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२२ ।“सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं.यावेळी ते म्हणाले कि, विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना झापलं ते योग्यच केलं. विधिमंडळात शिस्तीचा आग्रह प्रत्येकाने पाळायला हवा, तुम्ही तो नेहमी पाळता आणि जे पाळत नाही त्यांना योग्य शब्दात खडसावताही.

नीलम गोऱ्हे लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, आमदार रविंद्र वायकर, नितीन बानुगडे पाटील, मिलिंद नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, “सभागृहाची एक उंची आहे. तिथे कसं वागलं पाहिजे, याचे काही नियम आहेत. मग तो मंत्री असो वा कुणी असो.. सभागृहात आल्यावर त्याने शिस्तीत वागलं पाहिजे. हे खडसावून सांगितलं, शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल तुमचे खरं तर आभार… तो कोण होता, म्हणून तुम्ही त्याला खडसावलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देत नाही. तुम्ही ज्या पदावर बसलात त्याला न्याय देताना सभागृहाची उंची पाळून संबंधिताला योग्य शब्दात समज दिली गेलीच पाहिजे.. अगदी उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले, मग तो कोणताही मुख्यमंत्री असो, तरी तेव्हासुद्धा कान उघाडण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
शिक्षकांच्या बाबतीतील एका प्रश्नावरुन गदारोळ सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गदारोळादरम्यान मंत्री गुलाबराव यांना वारंवार खाली बसण्याची विनंती करत होत्या. गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब. ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही? परत परत सभापती सांगतायत, ही कुठली पद्धत आहे? चौकात आहात का तुम्ही? असा त्या म्हणाल्या. यानंतर गुलाबराव पाटील यांनी मी मंत्री आहे! यावर डॉ. नीलम गोऱ्हे मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे. दरेकरजी काय चाललंय? हे अहो शांत राहा, असेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Back to top button