जळगाव शहर

सामाजिक कार्यकर्ते व समाज सुधारक यांचे होणारे खून थांबवण्यासाठी ठोस कायदा आणा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२२ । सामाजिक कार्यकर्ते व समाज सुधारक यांचे होणारे खून थांबवण्यासाठी ठोस कायद्याची गरज आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम.कलबुर्गी, गौरी लंकेश या चारही खुनाच्या प्रकरणात तपास यंत्रणेतील अक्षम्य दिरंगाई बद्दल राज्य व केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. खुनात सहभागी असलेल्या सर्व संघटना आणि सुत्रधारांना तातडीने अटक करावी, अशी मागणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

तसेच त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी. धार्मिक मुलतत्ववादी लोक आणि त्यांच्या संघटनांवर बंदी घालावी. सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र कडक कायदा करावा.याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी भेटीची तारीख द्यावी अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आले आहेत.

तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेल द्वारे देखील शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन पाठवले आहेत. शनिवारी सकाळी महात्मा गांधी उद्यान येथे शाखेच्या कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक करून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राहू असा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी, जिल्हा पदाधिकारी शिरीष चौधरी, विजय लुल्हे, शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर, सुरेश थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button