जळगाव जिल्हा

नागरिकांनो.. ऑनलाइन व्यवहार करताना ‘ही’ काळजी घ्या, नाही तर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । सध्याचे युग हे ऑनलाईन प्रणालीचे युग असून याद्वारे आपले व्यवहार अत्यंत जलद व सुलभरीतीनेस होत असल्याने नागरिक यास पसंती देत असतात. मात्र, हे व्यवहार करताना अनेकदा सायबर भामटे नागरिकांची फसवणूक करीत असून यापासून सावध राहण्याचे एक आवाहन सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांनी एका मेसेज द्वारे नागरिकांना केले असून सध्या हा मेसेज सावदा व परिसरात चांगलाच व्हायरल होत असून यापूर्वी यापरिसरात अनेकदा नागरिक या सायबर फसवणूक झाली असल्याने हा मेसेज नागरिकांन साठी अतिशय महत्वपूर्ण असा आहे.

सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले असून आपल्या घरातील प्रत्येक शिक्षित व्यक्तीने कोणतेही ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना कोणतेही ॲप डाऊनलोड करताना प्रथम त्याची माहिती घेणे आवश्यक आहे. कोणतेही नेट बँकिंग ट्रांजेक्शन करताना आपण ओटीपी नंबर इतरांना शेअर करू नका. हॉटेल, पेट्रोल पंप, मॉल आणि इतर ठिकाणी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आपण स्वतः स्वॅप करा, कोणत्याही अनोळखी इसमाच्या हातात देऊ नका, आणि पिन कोड कोणालाही शेअर करू नका. शिक्षित लोकांनी आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडील, मुले व इतर मंडळी ज्यांना मोबाईल वापरावयाची बिलकुल माहिती नाही त्या प्रत्येक व्यक्तींना आपण समजून सांगावे.

मोबाईलवर अनोळखी इसम व्हिडिओ कॉल करून संबंधित व्यक्तींची फसवणूक करण्याचे प्रमाण सर्रास मोठ्या प्रमाणात चालू आहे. तरी आपल्याला किंवा आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडील व इतर मंडळींना मोबाईलवर अनोळखी इसमाचा व्हिडिओ कॉल आला तर कृपया तो कोणी उचलू नये तात्काळ तो डिलीट करावा त्याबाबत घरातील शिक्षित व्यक्तींनी कुटुंबीयांना सांगणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच आपले व आपल्या घरातील इतर मंडळींचे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सेवांमध्ये अकाउंट असल्यास अकाउंट प्रोफाइल लॉक करून ठेवावे. आपली पर्सनल डिटेल्स आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांनाच म्हणजेच आपण ज्यांना ऍड करू त्यांनाच दिसेल अशा प्रकारे काळजी घ्यावी, तसेच अनोळखी व्यक्तींना शेअर होणार नाही याची काळजी घ्यावी. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इतर माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करत असताना समोरील व्यक्तींनी जर आपल्याकडे पैशाची मागणी केली असल्यास त्या व्यक्तीला आपण जोपर्यंत समक्ष भेटत नाही त्या व्यक्तीची खात्री करून घेत नाही तोपर्यंत कोणतेही पैशाचे व्यवहार करू नका.

तरी आपण व आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तीची सायबर गुन्हेंद्वारे फसवणूक होऊ नये याबाबत आपण काळजी घ्यावी व आपल्या घरातील मंडळींना त्यापासून सावध करावे व त्याबाबत शिक्षण द्यावे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. असे आवाहन सावदा पोलिसांन तर्फे स.पो.नी. देवीदास इंगोले यांनी केले असून सोबत सोबत त्यांनी याच आशयाचा एक मेसेज देखील सोशल मीडियावर टाकला असून याद्वारे ते जनजागृती करीत आहे,

Related Articles

Back to top button