महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीला मोठा धक्का ! माजी आमदारासह १२० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । शिंदे गटाच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्येही चलबिचल सुरू झालीय. एकीकडे शिवसेनेचे विविध पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील विविध नेते आता भाजपची वाट धरत आहे. अशातच अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अकोल्यातील बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी भाजपचा प्रवेश केला आहे. सोबतच १२० कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते बळीराम सिरस्कार यांनी अकोल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृतरित्या जाहीर प्रवेश घेतला आहे.

बळीराम सिरस्कार हे भारिप बहुजन महासंघाकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात सलग १० वर्ष आमदार राहिले आहेत. सिरस्कार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारिपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या तीन वर्षात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे ते अस्वस्थ होते.

राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे काहीतरी पदरात पडणार, या आशेवर असलेले माजी आमदार बळीराम सिरस्कार यांची आशा सत्ता गेल्यामुळे मावळली. त्यामुळे त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button