गद्दार हे गद्दारच असतात, जळगावात आदित्य ठाकरे गरजले

ऑगस्ट 20, 2022 2:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरात शिवसंवाद रॅलीच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आले असता विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज कुणी काहीही बोलत असले तरी गद्दार हे गद्दारच असतात. आज मी गद्दारांचा मुखवटा फाडायला आलो आहे असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

aaditya thackeray jpg webp

शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले आहे. गेल्या आठवड्यातील दौरा प्रकृती अस्वस्थतेमुळे रद्द झाल्यानंतर शनिवारी आदित्य ठाकरे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी सकाळी जळगाव विमानतळावर युवासेना ग्रामीणतर्फे तर त्यानंतर अजिंठा चौफुली येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डीमार्ट चौक, शिरसोली रस्त्याने ते पाचोरा येथे जाणार आहेत. आकाशवाणी चौकात शिवसेनेतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now