जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । तुम्ही जर जन्माष्टमीला सोने-चांदी (Gold Silver Rate) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील चांगल्या रिकव्हरीनंतर सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव दिसून येत आहे. आज सकाळीच्या सत्रात सोने किमतीत 148 रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात 465 रुपयाची घसरण झाली आहे. Gold Silver Rate Today
काय आहे आजचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,455 रुपये इतका आहे. तर दुसरीकडे आज सकाळी चांदीच्या दरात घसरण दिसून आली. त्यामुळे MCX वर, चांदी 55,978 रुपये प्रति किलो झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आजच्या घसरणीनंतर जळगावमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 52,400 रुपये इतका आहे. तर चांदी प्रति किलो जवळपास 57,700 रुपये इतकी आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 52,700 रुपये इतका होता. त्यात गेल्या आठ दिवसात सोने 300 रुपयांनी घसरले आहे. तर गेल्या आठवड्यात चांदीचा भाव 59,700 रुपये इतका होता. तो आज जवळपास 57,700 रुपयावर आला आहे. म्हणजे मागील आठ दिवसात चांदी तब्बल 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. (वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
उच्चांकापेक्षा सोने स्वस्तच :
सोने अजूनही जवळपास 4 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.