⁠ 
शनिवार, मे 4, 2024

नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात स्वातंत्र्य दिवस साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२२ । देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे दि.१२ ते १७ जिल्हाभरात विविध उपक्रम राबविले जात आहे. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रभात फेरी, जनजागृती रॅली, तिरंगा वितरण, पथनाट्य सादरीकरण केले जात आहे. जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम राबविले जात आहे.

दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता नेहरू युवा केंद्र जळगावच्या कार्यालयात ध्वजारोहण पार पडले. प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, रुकमिनी डागर, सुनील पंजे, लेखापाल अजिंक्य गवळी, सुश्मिता भालेराव, नेहा पवार, हेतल पाटील, रोहन अवचारे, शाहरुख पिंजारी, चेतन वाणी, सलाउद्दीन पिंजारी, अभिषेक बागुल, तुषार साळवी आदींसह महाराणा प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.