⁠ 
सोमवार, जून 17, 2024

लोकसभा निकालानंतर सोने आणि चांदी दरात मोठी बदल ; पहा आताचे दर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय जगतातील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर वरखाली होत असतात. मंगळवारी देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून या निकालांचे पडसाद सोने-चांदीच्या दरावर पडले.

जळगाव सुवर्णपेठेत सोने ७०० रुपयांनी वाढले तर चांदीच्या दरात १ हजार रुपयांची घसरण झाली. सोमवारी सोने प्रति तोळ्याचे दर ७१९०० रुपये होते. ते मंगळवारी निकालानंतर सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ होऊन सोने ७२६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. दुसरीकडे चांदी घसरून ९०००० रुपयावर आली.

निकालापूर्वी सोने-चांदीत मोठी घसरण झाली होती. निकालानंतर मौल्यवान धातूंनी पण धक्कातंत्राचा वापर केला.