जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच रोजच होणाऱ्या घरफोडी मुळे नागरिक देखील प्रचंड त्रस्त झाले आहेत. काल गुरुवारी पुन्हा पाचोऱ्या शहरात तीन दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. यात चोरट्यांनी तब्बल हजारोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान, ११ जुलै रोजी येथील बंद घरात चोरटयांनी डाव साधला होता, त्यात सुमारे ६ हजारांच्या रोकडसह 38 हजारांचा ऐवज लंपास केला होता. दरम्यान, या घटनेन शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. काल पुन्हा सदर घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे.
पाचोरा येथील सुपडु भादु शॉपिंग कॉम्प्लेक्समधील शितल प्रोव्हीजनचे मालक रमेश लक्ष्मण वाणी हे दि. ११ रोजी रात्री ८:३० वाजता दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता शेजारील दुकानदार रमेश अग्रवाल हे त्यांचे दुकानात आले. दरम्यान, रमेश वाणी यांना फोन करुन तुम्ही दुकान बंद करण्याचे विसरले काय ? अशी विचारणा केली असता रमेश वाणी हे आश्चर्यचकित होवुन त्यांनी दुकानाच रस्ता धरला असता दुकानाचे शटर उघडलेल्या अवस्थेत आढळून आले.
व दुकानातील ५०० रुपयांची चिल्लर ड्रावर मधुन गायब झालेली दिसली. व दुकानात बसविलेले दोन सी. सी. टी. व्ही. कॅमेरे तोडफोड करुन त्यांचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र, त्यांच्या दुकानातील एक सी. सी. टी. व्ही. कॅमेरा सुरू असल्याने त्यात दोन अज्ञात चोरटे चोरी करत असतांनाच सी. सी. टी. व्ही. मध्ये कैद झाले आहेत. त्यांचे जवळ असलेले सेवा मेडिकलचे संचालक विशाल ब्राह्मणकर यांच्या दुकानाचे शटरचे कुलुप टामीच्या साहाय्याने तोडुन ५०० रुपयांची चिल्लरची चोरी झाली.
तसेच त्र्यंबक गरबड वाणी या किराणा दुकानाचे संचालक मिलिंद पुंडलिक वाणी यांचे दुकान फोडुन दुकानातील ६ हजार रुपये चोरी करण्यास अज्ञात चोरटे यशस्वी झाले आहे. त्याला लागुनच असलेल्या राम फोटो स्टुडिओ हे दुकान देखील चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला असता दुकानास मध्यवर्ती लाॅक असल्याने ते लाॅक तोडण्यात चोरटे अयशस्वी झाले. फोडलेल्या दुकानांची कुलप जवळच असलेल्या कचरा कुंडीत टाकुन अज्ञात चोरटे पसार झाले असुन घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलिस काॅन्स्टेबल विनोद बेलदार, गजानन काळे, योगेश पाटील यांनी भेट देऊन घटनाक्रम जाणुन घेतला.
दरम्यान, शहरातील पुनगाव रोडवरील भाग्यलक्ष्मीनगर भागात भिकन विठ्ठल पाटील हे वास्तव्यास आहेत. गुरुवार, दि. 7 जुलै ते शनिवार, 9 जुलै दरम्यान भिकन पाटील हे घरी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा सेफ्टी दरवाजाचा कडी कोंडा तोडत घरात प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातील तिजोरी तोडत त्यात ठेवलेले 32 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व सहा हजार रुपये रोख असा 38 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.