जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । सावदा येथील सोमेश्वर नगर भागामध्ये मागील दोन महिन्या च्या कालखंडात नवीन गटारी आणि रस्ते निर्माण कार्य करण्यात आले. यामुळे नागरिकांना आनंद झाला व नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते. कारण गेल्या अनेक वर्षांपासून गटरी अभावी आणि रस्त्यांवर अभावी येथील नागरिकांची अतोनात हाल होत होते. मात्र आता गटारी निर्माण झाल्या त्यामुळे त्यात पाण्याचा आणि घाणीचा समावेश होणारच आता या गटरी काढण्यासाठी स्वच्छता कर्मचारी येतीलच असे नागरीकांना वाटत होते.
मात्र अद्याप या दोन महिन्यांमध्ये अजूनही एकही स्वच्छता कर्मचारी या भागामध्ये आलेला नाही तरी येथील नागरिकांना नाईलाजास्तव स्वतः गटरी साफ कराव्या लागत आहेत. त्यातील घाण बाहेर काढून टाकावी लागत आहेत जेणेकरून ह्या गटारी तुडुंब भरून पाणी अडकवू नये आणि दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होऊ नये कारण सध्या सर्विकडेच विविध आजार पसरलेले आहेत त्यामध्ये ताप येणे अंग दुखणे सर्दी खोकला यामध्ये मलेरिया टायफाईड असल्याने प्रकारचे आजार उद्भवत आहेत आणि या आजार सद्रूष्य रोगराईला फैलण्यास वाव मिळू नये या साठी नाईलाजाने स्वतः नागरिकांनी या गटारी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला व त्यांना वेळ मिळेल तो तसे ते करू लागले.आहेत. मात्र आता हा परिसर हद्द वाढ मध्ये समाविष्ट आहे. आणि या भागात नागरी सुविधा मिळणे हे येथिल नागरीकांचा हक्क आहे तरी याबाबत अजून पावेतो कोणत्याही ठोस पावले उचलली गेली नाहीत तरी येत्या काळामध्ये पालिका प्रशासनाने लक्ष घालून स्वच्छता कर्मचाऱ्यांना या भागात पाठवून गटरी कचरा काढून साफ करण्याचे आदेश द्यावे जेणे करून या भागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहिल अशी नागरिकांतून मागणी केली जात आहे