जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । लग्नाचे आमिष देत एकाने ३२ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका भागात ही ३२ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे. दरम्यान तिची ओळख चंदन मोतीराम चौधरी रा. खिर्डी ता. रावेर, जि. जळगाव याच्याशी झाली. दरम्यान त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडीतीने जळगाव शहर पोलीसांत फिर्याद दाखल केली.
त्यानुसार संशयित आरोपी चंदन मोतीराम चौधरी राहणार खिर्डी ता. रावेर जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहे.