जळगाव जिल्हा

सिनेट निवडणूक पारदर्शकतेसाठी होणार प्रक्रिया : कुलगुरू डाॅ. माहेश्वरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या पदवीधर मतदारांची नोंदणी सध्या सुरू आहे. यात विद्यापीठ विकास मंचने स्वत: एक लिंक तयार करून त्यावर मतदार नोंदणी सुरू केली आहे. ही पद्धत बेकायदेशीर असल्याचा अारोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व शिवसेनेने केला आहे. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने सोमवारी हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यानंतर विद्यापीठाने पहिल्यांदाच मतदार नाेंदणीनंतर प्रारूप यादी प्रसिद्ध करून आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देणार असल्याचा निर्णय घेतला, अशी माहिती कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी बुधवारी दिली

.
सिनेटच्या मतदार नोंदणीची मुदत १७ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी मतदार नोंदणीत गुंतलेले आहे. पक्ष, इच्छुक उमेदवार स्वत:च्या कार्यालयात संगणक, इंटरनेटची व्यवस्था करून देत मतदार नोंदणी करीत आहेत. या सर्व प्रक्रियेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागल्याने वातावरण तापले अाहे. गेल्यावेळी चुकांमुळे निवडणूक प्रक्रिया सहा महिने पुढे ढकलावी लागली होती. अशी स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी काळजी घेण्याची गरज अाहे. तशी तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे.

मतदार नोंदणी, आक्षेपासाठी मुदत देऊ
मतदार नोंदणीत चुका होणे, पारदर्शकता नसल्याचे एक मोठे उदाहरण मागच्या निवडणुकीत समोर आले आहे. त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी मतदार यादीवर आक्षेप घेतला होता. यादीत एकाच पत्त्यावर अनेक मतदार आहेत, बोगस नावे आहे, असा आक्षेप देशपांडे यांनी घेतला. मतदार यादीत सुधारणा व्हावी. नियमाप्रमाणे यादीतील सर्व नावे एका रजिस्टरमध्ये नोंदवून कुलगुरू व कुलसविच यांच्या सही, शिक्क्याने यादी निश्चित करावी, अशी मागणी देशपांडे यांनी उच्च न्यायालयात केली. त्यावर ६ महिने कामकाज झाले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ६ महिने पुढे ढकलली होती. अखेर देशपांडेंचा अर्ज मंजूर करीत न्यायालयाने नियमाप्रमाणे मतदार यादी करण्याचे आदेश केले. यावेळी सुमारे ८ हजार मतदार बोगस असल्याचे समोर आल्याची माहिती देशपांडेंनी दिली


मतदार नोंदणी पारदर्शकपणे सुरू आहे. प्रत्येक मतदाराने विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरच नोंद करणे गरजेचे आहे. या संकेतस्थळावर नोंद होणारे मतदारच अधिकृत ठरतील. नोंदणीसाठी मुदवाढ देण्यात येईल. नाेंदणी झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून आक्षेपासाठी मुदत दिली जाईल. यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
-प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, कुलगुरू

Related Articles

Back to top button