⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | धक्कादायक : २६ वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या, कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप!

धक्कादायक : २६ वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या, कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । एका २६ वर्षीय विवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचा समोर आला आहे. ही धक्कादायक घटना पाचोरा शहरातील गणपतीनगर भागात घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, विवाहितेच्या भावाने तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

प्रिया शहा देव (वय २६, रा. भोपाल, मध्य प्रदेश) असे मयत विवाहितचे नाव आहे. सदर विवाहितेचे विवाह एमएसएफ मध्ये सेवेत असलेले पाचोरा येथील विनोद सुरवाडे रा. गणपती नगर, पुनगाव रोड, पाचोरा यांचेशी झाला होता. दरम्यान विवाह झाल्यापासुन पती – पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून नियमित भांडण होत असत. याबाबत प्रिया हिने वारंवार आपल्या माहेरच्या मंडळींना याबाबत कल्पना दिली होती. दि. ७ ऑगस्ट रोजी सुद्धा प्रिया व विनोद यांच्यात सकाळ पासुनच भांडण सुरू झाले होते. याच दिवशी प्रिया हिने रात्री ९ ते १२ वाजेला टप्प्या टप्प्याने भोपाल येथे वास्तव्यास असलेल्या आपली बहिण दिपाली शेजवाल भ्रमणध्वनीद्वारे पती विनोद हा दिवसभर भांडण करत असल्याची कल्पना दिली.

दरम्यान वाद विकोपाला जाऊ नये म्हणून प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व त्याचे मेहुणे शशांक शेजवाल हे प्रिया व विनोद यांना समजविण्यासाठी तसेच येणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी बहिण हिस भोपाल येथे घेवुन जाण्याच्या उद्देशाने भोपाल येथुन दि. ७ ऑगस्ट रोजी रात्री पाचोरा येथे येण्यासाठी निघाले. दरम्यान याबाबत शशांक शेजवाल यांनी विनोद सुरवाडे यांना पुर्व सुचना देखील दिली होती. मात्र नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. दि. ८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास विनोद सुरवाडे यांच्या मामी ह्या प्रिया हिस चहा देण्यासाठी खोलीत गेले असता प्रिया हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

यावेळी प्रिया हिच्या भावाने एकच हंबरडा फोडला. तसेच माझी बहिण आत्महत्या करुच शकत नाही. असा संशय प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व मेहुणे शशांक शेजवाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच घटनास्थळाची वस्तुस्थिती देखील संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पाचोरा पोलिस काय भुमिका घेतात याकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह