जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । पतीने बनावट स्वाक्षऱ्या करून पत्नीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूनम अभिषेक शर्मा (वय-३२) रा. नेहरूनगर, मोहाडी, जळगाव या आई-वडील भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. त्या कर्नाटक राज्यातील बंगलरू येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. २०१५ मध्ये त्यांचा विवाह अभिषेक सूनील शर्मा (वय-३२) रा. आदर्शनगर, जळगाव यांच्याशी झाला. दोघे पती-पत्नी हे नोकरीला कर्नाटक येथे नोकरी करतात. त्यानंतर दोघांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये बँगलरू येथे एकूण ७९ लाख ३२ हजार रुपये किमतीचा फ्लॅट बुक केला. त्यांसाठी त्यांनी १६ लाख रूपये देखील अडव्हान्स म्हणून दिले.
यामध्ये पूनम शर्मा यांचे ८ तर त्यांचे पती अभिषेक शर्मा यांचे ८ असे एकूण १६ लाख रुपये दिले होते. सदर फ्लॅट हा दोघांच्या नावे रजिस्टर केला होता. याचदरम्यान पती-पत्नीचा वाद झाल्याने पुनम शर्मा या माहेरी नेहरूनगर, जळगाव येथे आईवडिलांकडे राहण्यासाठी गेल्या तर तीचा पती आदर्श नगर येथे राहत आहे.