बातम्या

Rain News : उत्तर महाराष्ट्रासह आठ जिल्ह्यात पावसाची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । नाशिक, सोलापूरसह उस्मानाबाद, ठाणे, पालघर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. यासोबतच वेगवान वारेही वाहतील. जवळपास ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.


 मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं आहे. मुंबई हवामान विभागाने पावसाच्या अंदाजाबाबत त्यांनी ट्विटमधून माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1554393025702375424?s=20&t=oNH2S9ZX3XMbkEaC-cLVxQ

हवामान विभागाच्या मुंबईच्या रडारवरील दुपारी २.४५ ची अपडेट होसळीकर यांनी आणखी एका ट्विटमध्ये दिली आहे. पालघर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील उत्तर भागात पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुण्यावर पावसाचे ढग जमा होत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button