जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहेत. काल सायंकाळी चाळीसगाव शहर पोलिसांनी अवैद्य गुटखा भरलेला ट्रक पडकला आहे. यात सुमारे १५१ पोते गुटख्याने भरलेले आढळून आले. दरम्यान, ट्रकसह ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील नेरी ते जळगाव रस्त्यावर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला, तंबाखू घेवून जाणार कंटेनर जामनेर पोलिसांनी ३० मे रोजी पकडला होता. यात सुमारे ७ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
तर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील लाली पान सेंटर येथे बेकायदेशीररित्या गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना ५ रोजी एका कंटेनरवर संशय आल्याने त्याचा पाठलाग केला असता. चक्क त्यात अंदाजे १ कोटीचा गुटखा आढळुन आला होता. जिल्ह्यासह ग्रामीण भागात असे प्रकार वारंवार समोर येत आता पोलीस प्रशासन सतर्क झाली असल्याचे समजते.
चाळीसगाव शहर पोलिसांनाशहरातून कंटेनरमध्ये गुटखा भरून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मालेगावरोड बायपासजवळ पथकाने सापळा रचला. यात त्या संशयास्पद कंटेनरची तपासणी केली असता यात १५१ पोते गुटखा भरल्याचे आढळून आले. यात सुमार ९२ लाख रूपये इतके असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर ट्रक आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, सागर ढिकले, विनोद भोई, राकेश पाटील, पवन पाटील यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे परिसरातील गुटखा तस्कर धास्तावले आहेत.