खडसेंच्या अडचणीत वाढ : भोसरी जमीन घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । पुणे येथील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. पुणे लाचलुचपत विभागाने या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज न्यायालयामध्ये तपास करण्याच्या मागणीसाठी अर्ज सादर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसेंना अजून एक धक्का दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी एकनाथ खडसे यांना जोरका झटका दिला आहे. खडसे यांची भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होणार आहे. पुणे लाचलुचपत विभाग याची चौकशी करणार आहे. यासाठी न्यायालयामध्ये तपास करण्याच्या मागणीसाठी अर्ज सादर केला आहे.
याबाबत न्यायालयाने 26 ऑगस्ट ही तारीख पुढील सुनवणीसाठी दिली. 26 तारखेला न्यायालय काय आदेश करणार आहे. याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागलेलं आहे. एकनाथ खडसे यांना आघाडी सरकारमध्ये भोसरी भूखंड घोटाळा प्रकारांनी खडसे याना क्लिनचिट मिळाल्यानंतर या प्रकरणात लाचलुचपत विभागाला नव्याने तपास करण्यासाठी पुन्हा न्यायालयात अर्ज सादर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.