⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अंचलवाडीला चक्क जेसीबीच केला लंपास

अंचलवाडीला चक्क जेसीबीच केला लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस चोरीचे सत्र वाढतच आहेत. अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथून चक्क जेसीबीच लंपास केल्याची घटना समोर आली आहे. शहरात व ग्रामीण भागात बऱ्याच नागरिकांचे वाहने घरा बाहेर लावली जातात. मात्र, अमळनेरात सदर घटना उघडीस आल्याने जिल्ह्यासह ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज नामदेव पाटील (वय २४ रा.मानराज पार्क पिंप्राळा, जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पाटील हे शिवशक्ती कन्ट्रक्शन नावाचा व्यवसाय करतात. यावरून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांचा शिवशक्ती कन्ट्रक्शनच्या नावावर ( js८१exc) कंपनीचे १४ लाख रुपये किमतीचे (jcb) असून पंतप्रधान ग्रामसडक योजनांतर्गत ते काम पाहतात. अमळनेरच्या अंचलवाडी येथे सुमारे ५ महिन्यांपासून काम सुरु असल्याने सदर (jcb) कामाच्या ठिकाणीच होते.

मात्र, दि.२३ ते २७ जुलैदरम्यान सदर (jcb) कुणी तरी अज्ञात भामट्याने चोरून नेले. या प्रकरणी राज नामदेव पाटील यांनी २९ रोजी पोलिसांत फिर्याद दाखल केली. घटनास्थळी जयपाल, अमळनेर हिरे यांनी भेट दिली. त्यानुसार भादंवि कलम ३७९ प्रमाणे अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जयपाल हिरे करत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह