⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | वाघूर उपसा सिंचन योजनेचे ७५ व्हॉल्व्ह चोरी

वाघूर उपसा सिंचन योजनेचे ७५ व्हॉल्व्ह चोरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे सत्र सूरच आहेत. काल बुधवारी रोजी वाघूर कालवा उपसा सिंचन योजनतेचे चक्क ७५ व्हॉल्व्ह अज्ञात भामट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलिसांत अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खूशल डोंगरमल देसर्डा (वय ३२, रा भिकमचंद जैन नगर, जळगाव) यांनी नशिराबाद पोलिसांत तक्रार दिली. देसर्डा हे जैन इरिगेशन सि.लि.जळगाव, येथे जुनिअर प्रोजेक्टेर मॅनेजर आहेत. महाराष्ट्र शासनाने कानसवाडा, शेळगांव, कडगाव व इतर शिवारात राबवलेल्या वाघूर कालवा उपसा सिंचन योजनेचे १ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचे व्हॉल्व्ह कुणी तरी अज्ञात भामट्यांनी चोरून नेले. हा प्रकार दि.२७ रोजी उघडीस आला.

या प्रकरणी खूशल डोंगरमल देसर्डा यांनी नशिराबाद पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी सॅनोपी अनिल मोरे यांनी भेट दिली. त्यानुसार भादंवि कलम ३७९ प्रमाणे अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह्स्को अतुल महाजन करत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह