जळगाव शिवसेनेच्या महापौरांनी दिले भाजप मंत्र्यांना पत्र, वाचा जसेच्या तसे
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । जळगाव शहाराच्या शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांनी नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी कोणत्याही खासगी कामासाठी लिहिले नसून जळगाव शहराच्या विकासाच्या अनुशंघाने लिहिले आहे. जळगावच्या शहराचा विकास खोळंबला आहे. रस्ते होत नाहीत यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता औरंगाबाद महामार्गाचे कामही संथ गतीने सुरु असल्याने या बाबद तक्रार महापौर जयश्री महाजन यांनी केली आहे.
जळगाव महानगरपालिका हद्दीतील रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे काम सुमारे तिन वर्षापासून सुरु आहे. परंतु कामात अत्यंत दिरंगाई होत असून कामाची प्रगती अत्यंत मंदगतीने होत आहे. जळगांव औरंगाबाद रस्त्याकडील जळगांव ते एम.आय.डी.सी. प्रवासा दरम्यान अनेक मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे जळगांव ते औरंगाबाद प्रवास अवघड झाला आहे. जळगांव पासून अवघ्या 50 कि.मी. असलेल्य राष्ट्रीय वारसा अजिंठा लेणी प्रवाश्यांना जाणे-येणे देखिल अवघड झालेले आहे. रस्त्याच्या तक्रारीचे प्रमाण खुपच वाढलेले असून नागरीकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यामुळे जनतेस उत्तर देणे अवघड बनले आहे. आपण या कामाची सूचना लवकरात लावर द्या आणि काम मार्गी लावा असे पत्र नितीन गडकरी यांना महापौर जयश्री महाजन यांनी लिहिले आहे.