⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | मोठी बातमी : बाजार समितीचे उत्पन्न २० लाखांवरून २० हजारांवर

मोठी बातमी : बाजार समितीचे उत्पन्न २० लाखांवरून २० हजारांवर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । गेल्या काही दिवसांपासून अमळनेर बाजार समितीत धान्याची आवक कमी झाली झाल्याने सोमवारी ९०० क्विंटल धान्य विक्रीला आले. मार्च ते जून या काळात दररोज सुमारे आठ ते दहा हजार क्विंटल धान्याची आवक होते मात्र आता आवक आता १० टाक्यांवर आली आहे. ज्यामुळे हंगामात दिवसाला वसूल होणारी २० लाखांचे बाजार समिती शुल्क सध्या केवळ २० हजारांवर आले आहे.


अमळनेर बाजार समितीत मार्चपासून दररोज आठ ते दहा हजार क्विंटल धान्याची आवक होत असे. त्यामुळे दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल होत असे. तसेच हमाल, मापाडी यांच्या हाताला काम मिळत होते. मात्र, आवक कमी झाल्याने हमालांना मिळणारा रोजगार कमी झाला आहे. सध्या केवळ उघड्यावर पडलेल्या मालाची गोदामात रवानगी करण्यासारखी किरकोळ कामे सुरू आहे. पावसामुळे धान्याची आवक मंदावली आहे. सध्या गहू, बाजरी व ज्वारी तसेच हरभऱ्याची केवळ थोडीफार आवक होत आहे.


सोमवारची आवक
गहू १०० क्विं , बाजरी २०० क्विं, दादर १५० क्विं, ज्वारी २०० क्विं, मका ४० क्विं, चना ६० क्विं, मूग १० क्विं, हरभरा १४० क्विं, चवळी २ क्वि, शेंगा १८ क्विं, तीळ ५ क्विं, सोयाबीन २ क्विं, एकूण – ९७७ क्विं.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह