मुक्ताईनगरमध्ये घडलेली घटना वैयक्तीक ; राजकीय वळण देऊ नये – आ. पाटील
जळगाव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | काल घडलेली ती घटना वैयक्तीक असुन त्या प्रकाराला राजकीय वळण देऊ नये अशा पद्धतीने मुक्ताईनगर मतदार संघांचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. काल घडलेला हा प्रकार हा दुर्दैवी आहे.हा प्रकार वैयक्तीक असुन राजकीय वळण देऊ नये असे व्यक्तव्य मुक्ताईनगर संघाचे आमदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.
माझ्या माहीतीनुसार, गेल्या तीस-चाळीस वर्षात छोटे-मोठे अनेक भांडणे झाली. मात्र यामुळे एखादी गटबाजी किंवा या समाजाचं – त्या समाजाचं अस कधी झालं नाही. काल घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. जर कोणी राजकारण करीत असेल तर राजकारण त्याच्या जवळ ठेवलं पाहीजे. काल घडलेला हा प्रकार हा वैयक्तीक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. हिंदु मुस्लिमांमध्ये जातीय सलोखा ठेवणे हि या गावाची गरज आहे. जर कोणी राजकिय व्यक्तीच्या माध्यमातुन हे जर घडत असेल तर कठोर शब्दांमद्ये टिका केली पाहीजे असे आमदार पाटील म्हणाले.
काल घडलेला मारहाणीचा प्रकार लहान मुलीचा असल्याने ‘एका आईचं ह्रदय काय असते…त्या भावनेतुन झाला. संद्याकाळपर्यत शहरात शांतता होती मात्र काही लोकांनी एका मुस्लिम व्यक्तीला सामुहिक पद्धतीने मारहाण करण्यात आली. अशी चुकीच्या पद्धतीने पोस्ट व्हायरल केली हि चूक आहे.