Chopda News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । शिवसेनेत फूट पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला. त्यानंतर शिंदे गट व भाजपाचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारले आहेत. परंतु, अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाहीय, त्यामुळे नवीन मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक कार्यकर्त्यांकडून व संघटनेकडून आपापल्या विधासभातील आमदारांना मंत्री पद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चोपडाच्या आमदार लताताई सोनवणे यांना देखील आदिवासी मंत्री पद द्यावे, अशी मागणी आझाद आदिवासी कोळी समाज संघटनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार महाराष्ट्रात ४७ जमाती आदिवासी साठी पात्र आहेत. राज्यातील आदिवासी जमाती साठी येणाऱ्या योजनांसाठी आदिवासी विकास विभागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र, या निधीतून योजना राबविताना एकाच राज्यातील आदिवासी जनतेस सावत्र भावाची वागणूक दिली जाते. जातीचा दाखला व वैधता दाखल्या पासून आदिवासींना वंचित ठेवले जाते. आदिवासींसाठी ज्या योजना राबविल्या जातात, त्या प्रत्यक्षात आदिवासी पर्यंत पोहचत नाही. त्या योजना कागदावरच पुर्ण केल्या जातात. मात्र, प्रत्यक्ष आदिवासी ना कोणताच लाभ होत नाही.
तसेच गेल्या स्वातंत्र्यापासून जो गरीब आदिवासी आहे. तो तसाच पिचलेल्या अवस्थेत आहे. हजारो वर्षांपासून सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास झालेला नाही हे उघड सत्य आहे. महाराष्ट्रातील आदिवासी वर होत असलेला अन्याय दुर करण्यासाठी व आदिवासींना हक्क व संरक्षण मिळण्यासाठी आदिवासी महिलेंला आदिवासी मंत्री पद दिले तर खऱ्या अर्थाने फायदा होईल व आदिवासींचा सामाजिक शैक्षणिक विकास होईल म्हणून नविन मंत्रीमंडळात आमदार लता ताई सोनवणे यांना आदिवासी मंत्री दिले, तर राज्यातील संपूर्ण आदिवासी कोळी समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल. असेही निवेदनात म्हटले आहे.
आमदार लताताई सोनवणे यांना आदिवासी मंत्री पद द्यावे. अशी मागणी जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष डिगंबर सोनवणे, शहर अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, अतुल सोनवणे, जीवन सोनवणे, देविदास सोनवणे, सागर सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, गौरव तायडे (कोळी), ललित सोनवणे यांनी केली आहे.