⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

IGU चे सदस्य होण्याचा भू-अभ्यासक भावेश पाटील यांना मिळाला मान

KBCNMU, Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । इंडियन जिओ-फिजिकल युनिअन (IGU) चे सदस्य म्हणून भावेश दिनू पाटील यांची नुकतीच निवड झाली असून संपूर्ण उत्तर महाराष्ट्र विभागातील एकमेव आणि पहिले भू-अभ्यासक होण्याचा मान भावेश पाटीलला मिळाला आहे.

१९६४ साली भारतीय भू-भौतिक अभ्यासक आणि भू-शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधन कार्याच्या प्रकाशनासाठी आणि त्यांच्यामध्ये विचारांच्या देवाणघेवाणीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मंच प्रदान करण्याच्या उद्देशाने डॉ.के.आर रामनाथन यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन जिओ-फिजिकल युनिअन स्थापना करण्यात आली. भारत देशात युनिअन वाटचाल १५ सामान्य सदस्य सोबत सुरु झाली; आता युनिअनमध्ये ६०० पेक्षा अधिक सदस्य देशाच्या सर्व भागातून आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही क्षेत्रात भू-भौतिकशास्त्राचे प्रतिनिधित्व तसेच संशोधन प्रकल्प, बैठका, परिसंवाद इत्यादींचे आयोजन आणि त्यात भाग घेण्यासाठी तत्सम विद्वान संस्थांना सहकार्य करते. इंडियन जिओ-फिजिकल युनिअन (IGU) भारत सरकारच्या नीती आयोगकडे नोंदणी असलेली संस्था आहे.

भावेश पाटील हे उपयोजित भूविज्ञान विभाग, पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाला, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे मागील चार वर्षापासून नंदुरबार जिल्यातील आदिवासी बहुल भागातील भूगर्भ आणि भूजल गुणवत्ता संबधी प्रा. डॉ. स. ना. पाटील (विभागप्रमुख) यांच्या मार्गदर्शन अंतर्गत संशोधन कार्य करीत आहेत. भावेश पाटील यांनी ११ राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय शोधपरिषधांमध्ये सहभाग नोंदविला असून ५ शोधनिबंध विद्बयानिक मासिकामध्ये प्रकाशित केले आहेत तसेच २०२२ साली संशोधन कार्यासाठी जळगाव विद्यापीठतर्फे रायसोनी पीएचडी फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. भावेश दिनू पाटील यांना विद्यापीठचे प्र-कुलगुरू डॉ सोपान इंगळे, उपयोजित भूविज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. स. ना. पाटील, प्राचार्य डॉ उदय कुलकर्णी आणि भू-शास्त्रज्ञ डॉ आई ए खान (पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले.