जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज बुधवारी सोन्याच्या दरात 201 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आज स्वस्तात सोनं खरेदीची संधी आहे. चांदीच्या दरातही आज घसरण झाली आहे.
आज सोन्याचा दर 50477 रुपये प्रति दहा ग्रॅम असा खुला झाला आहे. काल शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 50678 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 333 रुपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 55230 रुपयावर आला आहे. दरम्यान, आगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तो आता ५१ हजाराच्या घरात आला आहे. उच्चांक पातळीवरून सोने ५ हजार रुपयांनी स्वस्त विकलं जात आहे.
इंडिया बुलियन असोसिएशननुसार, 23 कॅरेट सोन्याचा दर 50275 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 46237 रुपये प्रति 10 ग्रॅम, 20 कॅरेट सोन्याचा दर 37858 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 29529 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सामान्यतः लोक 22 कॅरेट सोन्याचे दागिने बनवतात, ज्याचा दर 46237 रुपये आहे. 999 शुद्धतेची चांदी 55230 रुपये प्रति किलोवर पोहोचली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण झाल्याची नोंद आहे. अमेरिकेत सोने प्रति औंस 1,706.66 डॉलरच्या दराने व्यापार करत आहे, ते 3.94 डॉलरने खाली आले आहे. तर चांदी 0.03 डॉलरच्या घसरणीसह 18.75 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.