जळगाव लाईव्ह न्युज । १९ जुलै २०२२ । डॉलरच्या मजबूतीमुळे आज पुन्हा सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. देशांतर्गत बाजारात आज सकाळी सोने 61 रुपयांच्या घसरणीसह उघडले. MCX वर सकाळी ११ वाजता १०१ रुपयांच्या घसरणीसह ऑगस्ट डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ५०,२६० रुपये प्रति दहा ग्रॅमवर होता. चांदीचा भाव यावेळी ५०३ रुपयांच्या घसरणीसह ५५५८८ रुपये प्रति किलोवर उघडला. डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ४७२ रुपयांच्या घसरणीसह ५६५७० रुपयांवर होता. Gold Silver Rate Today
दरम्यान, दुसरीकडे जळगावमध्ये आज सोने ५१,७०० रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. तर दुसरीकडे चांदी ५७,५०० रुपयांवर आली आहे. यापूर्वी काल सोन्याचा भाव ५१,२०० रुपये प्रति तोळा इतका होता.व चांदीचा भाव ५७,५०० रुपये इतका होता. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
24 कॅरेट सोन्याची किंमत
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 5049 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेटची किंमत 4928 रुपये, 20 कॅरेटची किंमत 4494 रुपये, 18 कॅरेटची किंमत 4090 रुपये, 14 कॅरेटची किंमत 3257 रुपये प्रति ग्रॅम आहे.
राज्यातील बड्या शहरांतील भाव :
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,३९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२७० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,४७० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६१ रुपये आहे.
युरोपियन सेंट्रल बँकेची महत्त्वपूर्ण बैठक
युरोपियन सेंट्रल बँकेची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी युरोपियन सेंट्रल बँक व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ करू शकते, असे मानले जात आहे. दोन दशकांतील ही पहिली वाढ असेल. व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्याने डॉलर निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. सध्या तो 0.10 टक्क्यांच्या घसरणीसह 107.125 च्या पातळीवर आहे. गेल्या तीन व्यापार सत्रांमध्ये डॉलर निर्देशांकात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात हा निर्देशांक 109.14 वर पोहोचला होता. जर डॉलर कमजोर झाला तर सोने वाढेल. सध्या सोनेही अनिश्चिततेच्या वर्तुळात फिरत आहे.