⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गुजरात पासींग ट्रॅव्हल्स महाराष्ट्र पासींग तर झालीच नाही पण ८ लाखाचा लागला चुना

गुजरात पासींग ट्रॅव्हल्स महाराष्ट्र पासींग तर झालीच नाही पण ८ लाखाचा लागला चुना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । गुजरातची पासींग ट्रॅव्हल्स असताना ती महाराष्ट्र पासींग करू देईल व महाराष्ट्र परमिट देईल असे भासवून ८ लाखात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जळगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिला राजेश मेहता (वय ४९, रा.गुड्डूराजानगर गोकुलधाम अपार्टमेंट, जळगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. शिला व त्यांचे पती राजेश मेहता हे व्यापार करून आपले दरनिर्वाह करतात. त्यांना संशयित आरोपी हार्दिक कोयटा, जयश्री कोयटा, मित्तल हार्दिक कोयटा, इंदकुमार कोयटा (रा.ड्रीमलेड सिने, ग्रँट रोड समोर, मुंबई कॉरपोरेट ऑफिस, मुंबई) यांनी जुन्या बस ट्रॅव्हल्स किंमत १६ लाख रुपये ठरविले, सदर बस ही गुजरात पासींग ट्रॅव्हल्स असताना ती महाराष्ट्र पासींग करू देईल व महाराष्ट्र परमिट देईल. असे सांगतिले म्हणून फिर्याद यांनी २ लाख रोख व बाकी चेक ने असे एकूण ८ लाख २७ हजार १७८ रुपये दिले.

मात्र, आरोपीताने सदर बस दिली नाही. दरम्यान, विश्वासात घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी शिला राजेश मेहता यांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रवींद्र सोनवणे करत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह