महाराष्ट्र

Exclusive : जळगाव मनपा निवडणुकीत बंडखोरांची नवीन आघाडी करणार बिघाडी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये येत्या काळात एक नवीन आघाडी नावा रूपाला येऊ शकते. याबाबतची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही सूत्रांनी सांगितले आहे. सध्या जळगाव शहर महानगरपालिकेत मुख्य दोन राजकीय पक्ष कार्यरत आहेत. सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक भाजप तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील येत्या निवडणुकीत सक्रिय होणार हे नक्की आहे. यामुळे आता बंडखोरांच्या नवीन आघाडीची यात भर पडणार आहे. आता हि आघाडी नक्की कशी बिघाडी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेची येत्या वर्षभरात निवडणूक होणार असे म्हटले जात आहे. मात्र सध्या महानगरपालिकेमधील लोकप्रतिनिधींची अवस्था बघितली तर नक्की कोण कोणत्या पक्षात आहे. हे सांगण अतिशय कठीण झालं आहे. त्यामुळे या बंडखोरांवर येत्या निवडणुकीत कोणता पक्ष विश्वास ठेवेल का? हा प्रश्न या बंडखोरांनाही पडला आहे. त्यामुळे या नगरसेवकांनी आता येत्या काळात नवीन आघाडी निर्माण करायचे ठरवले असल्याची चर्चा आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये गेल्या वर्षभरात नक्की कोणता नगरसेवक कोणत्या पक्षात आहे? हे सांगणे अतिशय कठीण बनले आहे. कारण एका क्षणाला एका पक्षातील नगरसेवक दुसऱ्या क्षणी दुसऱ्या पक्षात असतात. यामुळे कोणताही राजकीय पक्ष या नगरसेवकांवर विश्वास ठेवेल हे अतिशय कठीण बनले आहे. यामुळे या नगरसेवकांचे राजकीय अस्तित्व काय असेल? याची चिंता या नगरसेवकांनाही भासू लागली आहे. अशावेळी जर कोणत्याही पक्षांनी आपल्याला उभं केलं नाही तर? किंबहुना आपल्याला निवडणूक लढवण्याची संधी दिली नाही तर? नवीन आघाडी बनवून त्यातून निवडणूक लढवायची असा निर्धार बंडखोर नगरसेवकांनी केला असल्याचे म्हटले जात आहे.

यात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, या सर्वांचे नेतृत्व महानगरपालिकेमधील एक मोठा नेता करणार आहे. हाच नेता या सर्व नगरसेवकांना एकत्र घेत एक नवीन आघाडी बनवणार आहे. कारण बंडखोरांप्रमाणे या नेत्यावरही अपात्रतेची टांगटी तलवार आहे अशावेळी जर सहा वर्षासाठी निलंबन झाले तर आपल्याच परिवारातील कोणाला तरी निवडणुकीत उभे करायचे आणि त्याला संपूर्ण पाठबळ द्यायचे असेही या आघाडीचे उद्दिष्ट असल्यामुळे सर्व बंडखोर नगरसेवक नवीन आघाडी करायला तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button