जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । शहरातील दीक्षितवाडीत घरबांधणीच्या वीट घरासमोर टाकल्याच्या कारणावरून व्यापाऱ्याला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय घनश्याम पाटील (वय ५०) रा. दिक्षीत वाडी, जळगाव यांनी पोलिसांत तक्रार दिली. पाटील हे आपल्या कुटुंबियांसह येथे वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराच्या जवळ सैय्यद आरिफ सैय्यद शाहीद याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. सैय्यद आरिफ याने संजय पाटील यांना न विचारता त्यांच्या घरासमोर बांधकामासाठी लागणारे विटा टाकल्या. यावरून संजय पाटील यांनी सैय्यद आरिफ याला विटा टाकल्याचा जाब विचारला. याच राग आल्याने सैय्यद आरीफ आणि त्याचा मुलगा आशु सैय्यद आरिफ सैय्यद यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी संजय पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी साडेसात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सैय्यद आरिफ सैय्यद शाहीद आणि आशु सैय्यद आरिफ सैय्यद या दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.