भुसावळ

भुसावळात तिसऱ्या मजल्यावर चढून वेडसर इसमाचा गोंधळ, उतरवण्याच्या प्रयत्नात पोलिसासह नागरिक जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । भुसावळ रेल्वे स्थानकासमोर असलेल्या सॅक्रेड हार्ट चर्चच्या तिसऱ्या मजल्यावर एक वेडसर इसम चढला होता. त्याला उतरवण्याच्या प्रयत्नात त्याने पोलीस आणि एका नागरिक जखमी झाले. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे स्टेशन परिसरामध्ये एकच गर्दी झाली होती.

शहरांमधील या इमारतीत ही वेडसर व्यक्ती चढल्याचे समजताच संबधितांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर तेथील कर्मचारी वसाहतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडवर तो व्यक्ती पडला होता. त्याने जिन्याच्या दाराला आतून कडी लावली होती. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील जफर शेख, कृष्णा पाटील सचिन चौधरी व सुनील सोनवणे यांनी खाली उतरण्यासाठी प्रयत्न केले. त्याने लोखंडी रॉडने जफर शेख व अल्फ्रेड पिंबॉडी यांना दुखापत केली. त्याच्याकडे चाकूही होती.

या घटनेत त्यालाही जखमा झाल्या. तो रक्तबंबाळ झाला होता. अर्ध्यातासानंतर त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याला खाली उतरवण्यात आले. त्याने आधी रेल्वे पार्किंग परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर तो प्रार्थनास्थळाच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. ते तेथे कसा पोहोचला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच तो तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असल्याच्या प्रत्यक्षदर्शीनी यावेळेस सांगितले. यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलीस कर्मचारी जफर शेख यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर त्या वेडसर इसमाला साकेगाव महामार्गावरील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले.

Related Articles

Back to top button